NSS मध्ये कोणते उपक्रम घेतले जातात?

NSS मध्ये वकृत्व, नेतृत्व आणि कर्तुत्व या गुणांना चालना देणारे उपक्रम घेतले जातात. श्रमप्रतिष्ठा उंचवण्यासाठी काही श्रमदानाची कामे- जसे स्वच्छता, वृक्षारोपण इत्यादी घेतली जातात. तसेच वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर इत्यादी सारख्या स्पर्धा आणि प्रात्यक्षिक उपक्रम घेतले जातात. त्यामुळे राष्ट्रभूमी, बंदभाव, ऐक्य वाढवण्यास मदत होते.