विद्यार्थी योजना विभागाशी संपर्क कसा साधावा? विद्यार्थी योजना विभागाशी संपर्क साधण्यासाठी महाविद्यालात विद्यार्थी विकास मंडळ अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेणे.
विषय चेंज करायचा असल्यास कशा करता येतो? आपण शिकत असला तो विषय बदल करायचा असल्यास प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर लगेच संबंधित विभागात प्रमुखांची व प्राचार्यांची परवानगी घेऊन कार्यालयातील नोंदणी मध्ये बदल करावा.
वसतिगृहात भोजनाची सुविधा आहे का ? वसतिगृहात भोजनाची सुविधा खालीलप्रमाणे:-
१. सकाळी ०८ ते ०८:३०नाष्टा.
२.सकाळी १० ते १०:३० जेवण.
३. संध्याकाळी ७ ते ७:३० जेवण.
वसतिगृहात राहण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात ? वसतिगृहात राहण्यासाठी खालीलप्रमाणे नियम पाळावे लागतात:-
विद्यार्थ्यांना एकदा रूम दिल्यानंतर वर्षभर बदलता येणार नाही.
वस्तीगृहात रोज उपस्थित पत्रकात उपस्थित नोंद करणे अनिवार्य आहे.
विद्यार्थ्यांनी आपली रूम स्वच्छ ठेवावी.
वस्तीगृहात
वसतिगृहात रात्री बाहेर जाण्याची परवानगी आहे का ? वस्तीगृहातून संध्याकाळी 5.00 वा नंतर बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.आपत्कालीन वेळेसाठी अधिक्षांच्या परवानगी शिवाय बाहेर जाण्यास परवानगी दिली जाते.
वसतिगृहात मोबाईल वापरण्याबाबत काही नियम आहे का ? वस्तीगृहात कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे.वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी दिली जाते.परंतु सायंकाळी सात वाजता वस्तीगृह अधीक्षकाकडे जमा असतात.